आता लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांसाठी शॉपिंगची सेवा सुरू होणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 3.66 कोटी रुपयांमध्ये 5 वर्षांसाठी कंत्राट देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या योजनेनुसार ट्रेनमध्ये कंपनीचे दोन सेल्समन असतील, हे सेल्समन कंपनीच्या ओळखपत्र आणि गणवेशासह असतील. त्यासोबत ट्रेनमध्ये शॉपिंग कार्ट उपलब्ध असणार आहे. प्रवासी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अथवा कॅश देऊन शॉपिंग करु शकतील. जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होईल. एकूण आठ टप्प्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. प्रत्येक टप्प्यात दोन ट्रेनमध्ये सेवा सुरू होईल. यापैकी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू होणार हे जवळपास नक्की आहे, इतर ट्रेनबाबत अद्याप माहिती नाही.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचं साहित्य इत्यादी वस्तू ट्रेनमध्ये विकण्याची परवानगी असणार आहे. ट्रेनमधील सेल्समनला सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सामान विक्रीची परवानगी असेल, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopping facility in indian train
First published on: 20-12-2018 at 10:03 IST