गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांनी दिलेल्या राज्यव्यापी बंदच्या हाकेला या समाजाचे वर्चस्व असलेल्या काही भागांतच प्रतिसाद मिळाला. मेहसाणा जिल्ह्य़ांत रविवारी जारी करण्यात आलेली संचारबंदी सोमवारी सकाळी उठविण्यात आली. बंदच्या हाकेमुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि मेहसाणा यांसारख्या मोठय़ा शहरांमधील भ्रमणध्वनी आणि माहिती महाजाल सेवा बंद ठेवण्यात  आली होती.