News Flash

“…तोपर्यंत भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेऊ नये”; क्रिकेटच्या प्रश्नावरुन गंभीरचा हल्लाबोल

"क्रिकेट ही खूप छोटी गोष्ट आहे. आपल्या..."

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आता भाजपा खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये असं म्हटलं आहे. एका निवडणूक प्रचारादरम्यान गंभीरला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्याने आपले मत व्यक्त केलं. भारतीय जवानांच्या जीवापुढे क्रिकेट ही खूप छोटी गोष्ट असल्याचेही गंभीरने सांगितले.

पाकिस्तानला जूनपर्यंत करडय़ा यादीत (ग्रे लिस्ट) ठेवण्याचा निर्णय आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) घेतला आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसै पुरविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पाकिस्तानने जी पावले उचलली आहेत त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्याचे निरीक्षण ‘एफएटीएफ’ने नोंदवले आहे. ‘एफएटीएफ’ची २७ कलमी कृती योजना पूर्ण करण्यासास पाकिस्तानला अपयश आल्याने त्यांना पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. दहशतवादी कारवायांमुळे या लिस्टच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलेल्या पाकिस्तानसंदर्भात गंभीरला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “जोपर्यंत ते सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवत नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत आपण पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचं नातं ठेवलं पाहिजे. कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सैनिकांचा जीव अधिक महत्वाचा आहे,” असं गंभीर म्हणाला.

नक्की पाहा >> Photos: स्वच्छ आणि पौष्टिक जेवण अवघ्या एका रुपयात… गंभीरने सुरु केली ‘जन रसोई’; हजारो गरजूंना होणार फायदा

पुढे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता गंभीरने, “क्रिकेट एक खूप छोटी गोष्ट आहे. आपल्या जवानांचे प्राण अधिक महत्वाचे आहेत. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळता कामा नये,” असं मत नोंदवलं.

दरम्यान, पाकिस्तानला एफएटीएफ काळ्या यादीत ठेवणार नाही, दहशतवादाविरोधातील प्रक्रियेत पाकिस्तानने लक्षणीय प्रगती केली आहे, असा दावा पाकिस्तानचे उद्योगमंत्री हम्माद अझहर यांनी केलाय. आव्हानात्मक परिस्थितीतही पाकिस्तानने दहशतवादविरोधी धोरणांची अमंलबजावणी करुन लक्ष्य साध्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘एफएटीएफ’ची २७ कलमी कृती योजना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांची जगाने स्तुती केल्याचा दावाही त्यांनी केलाय. पाकिस्तानने ९० टक्क्य़ांपर्यंत उद्दिष्ट साध्य केले असल्याचे ‘एफएटीएफ’नेच म्हटले आहे. कृती योजनेतील उर्वरित त्रुटी दूर करण्यासाठी एफएटीएफने पाकिस्तानला आणखी चार महिन्यांचा कालावधी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 8:33 am

Web Title: should not have any relationship with pakistan till cross border terrorism stops bjp mp gautam gambhir scsg 91
Next Stories
1 पत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच
2 ‘मोदी, शहा यांच्या सूचनेनुसार बंगालमध्ये आठ टप्पे?’
3 नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करावीत : मोदी
Just Now!
X