News Flash

‘मनोहर पर्रिकर हयात असल्याचा पुरावा द्या , अन्यथा श्राद्ध घाला’

'सार्वजनिक अथवा खासगीतही ते कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आमच्या मनात खरंच शंका आहे'

(संग्रहित छायाचित्र)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची मागच्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे. मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी दिली. मात्र, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे हयात असल्याचे दाखवा, अन्यथा त्यांचं श्राध्द घाला असं आव्हानच गोवा काँग्रेसचे प्रवक्ता जितेंद्र देशप्रभू यांनी दिलं आहे.

मनोहर पर्रिकर यांची प्रकृती हा खरंच चिंतेचा विषय आहे. सार्वजनिक अथवा खासगीतही ते कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आमच्या मनात खरंच शंका आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारने जाहीर केलेली नाही. पर्रीकर जर खरोखरच सुस्थितीत असतील तर त्यांचा किमान व्हिडिओ तरी जनतेसाठी प्रसारित करावा. जनतेला त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाहायचं आहे, जर मुख्यमंत्री हयात असतील तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना पाहायचं आहे, आणि नसतील तर त्यांचं श्राध्द घालून टाका असं जितेंद्र देशप्रभू म्हणाले. याबाबतचा एक व्हिडीओ वृत्तसंस्था एएनआयने प्रसारित केला आहे.


गेल्या मार्चमहिन्यापासून पर्रिकर हे लवकरच कामावर रुजू होणार असल्याचं भाजपाकडून सांगितलं जात आहे, पण ही सर्व खोटारडेपणाची विधाने असून भाजप खोटारडेपणाचा महामेरु बनला आहे, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान, शनिवारी प्रथमच अधिकृतरित्या मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर गोव्यातील निवासस्थानी उपचार सुरु आहेत. उत्तर गोव्यात अलडोना येथे इमर्जन्सी केअर सेंटरचे उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी विश्वजीत राणे आले होते. तसंच, मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चांगली नाहीय. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे. यात लपवण्यासारखे काही नाही. मनोहर पर्रिकरांनी गोव्यातील जनतेची सेवा केली आहे. आता जर त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायाचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे असे विश्वजीत राणे म्हणाले होते. याशिवाय, मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामकाजात कुठेही अडथळा येत नाहीये. मला कुठेही अडथळा आलेला नाही. मी नव्या प्रकल्पांचे उदघाटन करत आहे असंही राणेंनी नमूद केलं होतं.
मनोहर पर्रिकर यांच्यावर दिल्लीत एम्समध्ये उपचार सुरु होते. दिल्लीहून विशेष रुग्णवाहिकेने त्यांना गोव्यात आणण्यात आले. मागच्या काही आठवडयांपासून पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसकडून सरकारवर दबाव आणला जात आहे. मनोहर पर्रिकर आजारपणामुळे सध्या राजकारणात सक्रीय नसले तरी ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2018 10:46 pm

Web Title: show everyone that goa cm manohar parrikar is alive asks goa congress
Next Stories
1 जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्याकडून पदत्यागाचे संकेत
2 जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचे 5 जवान जखमी
3 भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचं प्रशासकीय मुख्यालय उडवलं
Just Now!
X