News Flash

अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी सुविधा देण्याबाबत तातडीने सुनावणी नाही

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी दर्शन व पूजाअर्चा करतात, त्यांना सुविधा देण्याची गरज आहे.

| April 6, 2016 02:59 am

यावेळी दिल्ली सरकारचे वकील राजीव धवन यांनी सरकारची बाजू चिकाटीने लावून धरल्याने न्यायालयाने मुनाक कालव्यातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.

अयोध्या येथे वादग्रस्त ठिकाणी तात्पुरत्या राममंदिरात भेट देणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

स्वामी तुमची याचिका ही हस्तक्षेपाची आहे व त्याच्यावर इतर याचिकांबरोबरच सुनावणी केली जाईल, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने सांगितले आहे. यात न्या. उदय ललित  यांचाही समावेश होता.

स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी असलेल्या राममंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या सुविधा मिळत नाहीत, त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

यापूर्वी न्यायालयाने हे प्रकरण स्वामी यांनी तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांकडे सादर करावे असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार यांना रामजन्मभूमीच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करावा असे सांगितले होते. त्या ठिकाणी काहीतरी करा, शक्य असेल तर भक्तगणांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या, असे न्यायालयाने सांगितले होते. केंद्राने स्वामी यांनी केलेल्या मागणीवर म्हणणे मांडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. स्वामी यांनी याचिकेत असे म्हटले होते की, भगवान राम यांच्या जन्मठिकाणी जे तात्पुरते मंदिर आहे तेथे स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. केंद्र व राज्य सरकारने तेथे दिलेल्या सुविधा अपुऱ्या आहेत. १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे आदेश दिला होता, त्यामुळे वादग्रस्त ठिकाणी कुठल्याही सुविधा देण्यासाठी बांधकाम करण्यास मर्यादा आहेत, असे स्वामी यांनी सांगितले होते. लाखो िहदू भक्तगण तीर्थयात्रेसाठी मंदिराच्या ठिकाणी येतात. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी दर्शन व पूजाअर्चा करतात, त्यांना सुविधा देण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:59 am

Web Title: shri ram mandir ayodhya issue
Next Stories
1 बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांना जामीन
2 आयसिसकडून युरोपात हल्ल्याची भीती
3 हबल, स्पिटझर दुर्बिणींच्या मदतीने बटू दीर्घिकेचा शोध
Just Now!
X