News Flash

मोदी याच ‘अच्छे दिन’बाबत बोलत होते; अमोल पालेकर प्रकरणावरुन सिब्बलांची टीका

सरकारे येतील आणि जातील मात्र संविधानिक पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे, तुम्हाला हे पद मिळवून देणारे संविधानच सर्वश्रेष्ठ आहे.

कपिल सिब्बल

सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या अमोल पालेकरांचे भाषण मध्येच रोखले जाते, सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला जातो, कोणाला बोलू दिले जात नाही हा तर नवा भारत आहे ना. देश बदलतोय मोदी याच अच्छे दिनबाबत बोलत होते, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोदींवर निशाणा साधला.


सिब्बल म्हणाले, सरकारे येतात आणि जातात मात्र, सत्तेत असणाऱ्या प्रत्येकाची संविधानिकपदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बारीक नजर असते. ज्याच्यामध्ये उत्साह असेल आणि तो पंतप्रधानांशी प्रामाणिक राहिल अशा अधिकाऱ्याच्या शोधात ते असतात. मात्र, या अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, हे पद त्यांना संविधानाने दिलेले आहे, त्यामुळे संविधान सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याची प्रतारणा होता कामा नये.

राफेल डीलवर बोलताना सिब्बल म्हणाले, तत्कालीन कॅग राजीव मेहरिशी हे अर्थ सचिव असताना राफेल डील झाली होती. तेव्हापासून या करारात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, या प्रकरणात कॅग हे स्वतःचीच चौकशी कशी करतील? असा सवाल करताना पहिल्यांदा ते स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतील नंतर सरकारच्या. त्यामुळे हा स्वारस्याचा संघर्ष असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 6:28 pm

Web Title: sibbal lashes modi on amol palekar controversy
Next Stories
1 कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जेडीएस आमदाराला ३५ कोटींची ऑफर
2 अमेरिकेचे ‘चिनुक’ भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात
3 टीएमसी आमदार हत्या : भाजपा नेते मुकुल रॉय यांच्याविरोधात एफआयआर
Just Now!
X