News Flash

मोदींच्या ‘सुवर्ण’ योजनेला सिद्धिविनायक मंदिराचा प्रतिसाद, ४० किलो सोने गुंतवणार

आतापर्यंत सुवर्ण मुद्रिकरण योजनेला देशात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण मुद्रिकरण योजनेला आता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने प्रतिसाद दिला असून, आपल्याकडील ४० किलो सोने या योजनेमध्ये गुंतविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे ट्रस्टला प्रतिवर्षी ६९ लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे. एखाद्या मंदिर ट्रस्टने अशा पद्धतीने या योजनेमध्ये सोन्याची गुंतवणूक करण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरणार आहे. ‘मुंबई मिरर’मध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून सुवर्ण मुद्रिकरण योजनेला देशात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या योजनेत केवळ ४०० ग्रॅम सोनेच गुंतविण्यात आले होते. आता सिद्धिविनायक ट्रस्टने या एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने गुंतविण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेला भविष्यात आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तिरुपती येथील तिरूमला मंदिर आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा मंदिरही त्यांच्याकडील काही सोने या योजनेमध्ये गुंतविण्याची शक्यता आहे.
सिद्धिविनायक मंदिराकडे दान स्वरुपात जमा झालेले सोन्याच्या दागिन्यांचा या ४० किलोमध्ये समावेश आहे. हे सोने वितळवून शुद्ध स्वरुपात सरकारच्या योजनेमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या सोन्याची बाजारातील किंमत साडेसात कोटी भरण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 11:52 am

Web Title: siddhivinayak temple to invest 40 kg gold in gold monetisation scheme
Next Stories
1 खनिज तेलाची ४० डॉलपर्यंत उतरंड
2 ई-व्यापार मंचांवर म्युच्युअल फंडांच्या विक्रीसंबंधी ‘सेबी’कडून लवकरच नियमावली : सिन्हा
3 अर्थसंकल्पातील योजनांतर्गत आणि योजनेत्तर खर्चाच्या तरतुदी मोडीत काढण्याचे सरकारच्या विचाराधीन
Just Now!
X