News Flash

इम्रान खानच्या शपथविधीला सिद्धूंना मानाचे स्थान, घेतली लष्करप्रमुखांची गळाभेट

भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. या सोहळ्याला भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. सिद्धू यांना याशपथविधी कार्यक्रमामध्ये मानाचे स्थान मिळाले. पण सिद्धू यांनी पाकिस्तानमधील सोहळ्याला हजेरी लावली म्हणून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. सिद्धू यांनी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलत टीका केली आहे.

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. या सोहळ्यात सिद्धू यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. सिद्धू यांना पाक व्याक्त काश्मिरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला स्थान देण्यात आले होते.

काँग्रेसचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी सिद्धूंच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते. ते मित्रत्वाच्या नात्यानं तिथं गेले आहेत. पण, मैत्री ही देशापेक्षा मोठी नाही.’ असे अल्वी म्हणाले.

इस्लामाबादमध्ये झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली. तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांना १७६ मते मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 1:41 pm

Web Title: sidhu meets pakistan army chief general qamar javed bajwa at imran khans oath taking ceremony
Next Stories
1 Kerala floods: देवभूमीसाठी कलाकारांनीही दिला आर्थिक मदतीचा हात, केली याचना
2 Kerla Floods: बंगळुरु एफसी फुटबॉल क्लबचा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात
3 Kerala Floods : केंद्र सरकारची केरळला ५०० कोटींची मदत
Just Now!
X