अमेरिकेत एका शीख मुलाने त्याच्या सहविद्यार्थ्यांला त्याने शाळेत बाँब आणला आहे असे विनोदाने सांगितले असता, या मुलाला शिक्षा म्हणून सुधारगृहात पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अरमान सिंग सराय हा टेक्सासमधील अर्लिग्टनचा राहणारा असून त्याला ११ डिसेंबरला ताब्यात घेण्यात आले असून तीन दिवस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अर्लिग्टनचे पोलिस प्रमुख ख्रिस्तोफर कूक यांनी सांगितले की, अधिकारी निकोलस ज्युनियर हायस्कूल येथे शुक्रवारी दुपारी गेले व या मुलाच्या शिक्षकांना त्याने बॉंब आणल्याची व शाळा उडवून देण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर वर्ग रिकामा करून त्याच्या पिशवीची तपासणी करण्यात आली. या मुलाने आपण विनोदाने तसे म्हटल्याचे सांगितले पण त्याचे काहीएक न ऐकता सुधारगृहात रवानगी करण्यात आली. आपण अशा धमक्या देऊ नये हे लोकांना समजले पाहिजे म्हणून कारवाई केल्याचे कुक यांनी सांगितले.