25 November 2020

News Flash

VIDEO: अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरवर शीख समुदायाकडून पगडी दिन साजरा

पगडीबद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

छायाचित्र सौजन्य- ट्विटर

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर अनोखा टर्बन डे म्हणजेच पगडी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शीख बांधवांनी टाईम्स स्क्वेअरमधील हजारो लोकांना पगडी घातली. शीख समुदायाची ओळख जपण्यासाठी आणि अमेरिकेतील शीखांवर होणारे वाढत्या हल्ल्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘द शीख ऑफ न्यूयॉर्क’कडून ‘टर्बन डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांनी जवळपास ८ हजार अमेरिकन नागरिक आणि पर्यटकांच्या डोक्यावर पगडी बांधली. टाईम्स स्क्वेअरमध्ये उपस्थित असलेल्या विविध देशांच्या लोकांनी आनंदाने यामध्ये सहभाग घेतला. बैसाखी सणाच्या पार्श्वभूमीवर पगडी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेसह इतर देशांच्या मनात शीख समुदायाविषयी काही गैरसमज असतात. शीख बांधव परिधान करत असलेल्या पगडीविषयी अनेकांच्या मनात काही चुकीच्या समजुती आहेत. त्या दूर करण्यासाठी आणि पगडी हा शीख धर्मियांसाठी आस्थेचा विषय आहे, हा संदेश देण्यासाठी पगडी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

पगडी दिवस साजरा करण्यास २०१३ पासून साजरा करण्यात येत असल्याची माहिती द शीख ऑफ न्यूयॉर्क संस्थेचे अध्यक्ष चनप्रीत सिंग यांनी दिली. शीख धर्माची ओळख लोकांनी पटावी, या उद्देशाने पगडी दिवस साजरा केला जात असल्याचे सिंग यांनी म्हटले. ‘आम्ही शीख धर्माबद्दल आणि पगडीबद्दल जनजागृती करत आहोत. पगडी शीख धर्मियांसाठी मुकूटासारखी आहे आणि पगडी म्हणजे शीख धर्मियांचा अभिमान आहे. पगडी दिवसामुळे जे पगडी परिधान करत नाहीत, त्यांना या पगडीचे महत्त्व पटवून देण्याची संधी मिळते,’ असे चनप्रीत सिंग यांनी सांगितले.

शीख धर्मियांविरुद्ध असलेला द्वेष शालेय दिवसांमध्ये अनुभवल्याचे सिंग यांनी म्हटले. पगडी दिनाच्या निमित्ताने शीख धर्मियांची मूल्ये अमेरिकन लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते, असेही सिंग म्हणाले. पगडी दिनामुळे अमेरिकेसह विविध देशांमधील लोक भेदभाव टाळतील आणि त्यामुळे शिखांविरुद्ध द्वेष भावनेतून होणारे गुन्हे कमी होतील, असा विश्वासदेखील सिंग यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 5:36 pm

Web Title: sikh communicty celebrated turban day at times square in us
Next Stories
1 मुस्लिमांमधील मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज- पंतप्रधान मोदी
2 भविष्य निर्वाह निधीवर ८.६५ टक्के व्याज मिळणार
3 भारताला ‘गरीब’ म्हणणे स्नॅपचॅटच्या सीईओंना भोवले, मानांकनात घसरण
Just Now!
X