News Flash

मुस्लिम तरुणाला जमावापासून वाचवणारा शिख पोलीस अधिकारी सोशल मीडियावर ठरला ‘हिरो’

उत्तराखंडमध्ये एका शिख पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम तरुणाला संतप्त जमावापासून वाचवल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तराखंडमध्ये एका शिख पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम तरुणाला संतप्त जमावापासून वाचवल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी उत्तराखंडच्या रामनगरमध्ये गगनदीप सिंग वेळेत पोहोचले नसते तर जमावाने एका मुस्लिम तरुणाला ठेचून मारले असते. रामनगर येथील एका प्रसिद्ध मंदिराच्या परिसरात तणाव निर्माण झाल्याचे गगनदीप सिंग यांना समजले.

ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मुस्लिम तरुण आणि हिंदू मुलीचे प्रेम प्रकरण समजल्यामुळे संतप्त झालेला जमाव त्या मुस्लिम तरुणाला मारहाण करण्याच्या तयारीत होता. प्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कपासून रामनगर शहर फार लांब नाहीय. काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते या जोडप्याला त्रास देत होते.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये या मुस्लिम तरुणाला संतप्त जमावाने घेरल्याचे दिसत आहे. जमावाकडून घोषणाबाजी केली जात होती. जमाव या मुलाला मारहाण करण्याच्या तयारीत होता पण गगनदीप सिंग यांनी या मुलाला आपल्या छातीजवळ पकडले होते. गगनदीप यांनी स्वत:च्या शरीराची ढाल करुन या मुलाचे रक्षण केले. गगनदीप यांनी हिंसक झालेल्या जमावासमोर जी हिम्मत दाखवली त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर ते हिरो ठरले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2018 5:36 pm

Web Title: sikh police officer saved muslim man
टॅग : Uttarakhand
Next Stories
1 सर्पदंश झालेल्या आईचे दूध प्यायल्याने बाळ आणि माता दोघींचा मृत्यू
2 ओपीनिअन पोलमध्ये राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, मोदी पिछाडीवर
3 लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांचे प्रमाण देशात तुलनेने कमी – सर्वेक्षण
Just Now!
X