टिकटॉक या चीनच्या अ‍ॅपवर भारताने बंदी घातली असून अमेरिकेनेही त्याच प्रकारची भूमिका घ्यावी, असे मत सिलिकॉन व्हॅलीमधून व्यक्त होत आहे.

फेसबुक, ट्विटरवर चीनमध्ये बंदी आहे, असे असताना येथे टिकटॉकला परवानगी का दिली जाते, भारताप्रमाणे अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घातली पाहिजे, असे टीआयईचे माजी अध्यक्ष व्यंकटेश शुक्ला, क्युबा-अमेरिकन म्युझिक व्हिडीओचे संचालक रॉबी स्टारबक यांनी म्हटले आहे.