News Flash

मुंबईहून सिंगापूरसाठी विमानानं उड्डाण केलं अन् ऑईल गळती सुरू झाली

इंडिगो प्रशासनाकडून दुजोरा

सगळीकडे नववर्षाचा आनंद साजरा केला जात असताना हवाई वाहतूक करणाऱ्या इंडिगोच्या विमानानं मुंबईहून सिंगापूरकडे उड्डाण केलं. मात्र, काही काळानंतर प्रवाशांना घाम फुटावा अशीच घटना घडली. विमान आकाशात झेपावल्यानंतर अचानक ऑईल गळती सुरू झाली. मात्र, वैमानिकांनी वेळीच प्रंसगावधान दाखवले आणि विमान नागपूरला उतरवण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या वृत्ताला इंडिगो प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.

एक जानेवारीला इंडिगोची ६ई१९ हे विमान मुंबईहून सिंगापूर निघाले होते. मुंबईहून विमानानं उड्डाण केले. विमान आकाशातून सिंगापूरच्या दिशेने जात असताना काही वेळानं विमानाच्या ऑईल टँकमधून गळती सुरू झाली. त्यामुळे विमान तातडीने नागपूरच्या दिशेने वळवण्यात आलं. नागपूर येथे उतरल्यानंतर हे विमान तांत्रिक पाहणीसाठी पाठवण्यात आले. नागपूरमध्ये प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.

या घटनेसंदर्भात इंडिगो प्रशासनानेही माहिती दिली आहे. प्रवाशांची इतर विमानामध्ये जाण्याची व्यवस्था करण्यात आली. विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना पाच तास ताटकळ बसावे लागले. त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो, असं इंडिगोने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 12:50 pm

Web Title: singapore bound indigo flight diverted to nagpur due to oil leak bmh 90
Next Stories
1 NCP leader DP Tripathi passes way : राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांचे निधन
2 Tata Sons moves SC: सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीवर स्थगिती आणा, टाटा सन्सची सुप्रीम कोर्टात याचिका
3 दिल्लीत आग विझवताना इमारत कोसळली; जवानांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले
Just Now!
X