News Flash

करोनाच्या हाहाकारात सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेची वाताहत; जीडीपी ४१ टक्क्यांनी घसरला

सिंगापूरमध्ये अंशतः लॉकडाउन

करोनाचा हाहाकार सगळ्या जगात जाणवतो आहे. अशात लॉकडाउन जाहीर केला जाणं ही अनिवार्य बाब आहे. मात्र त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो आहे. सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेची वाताहात झाली आहे कारण त्यांचा जीडीपी १० किंवा १२ नाही तर तब्बल ४२ टक्क्यांनी घसरला आहे. आशियाई देशांमध्ये सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला बसलेला हा सर्वात मोठा फटका आहे. Bloomberg ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मागील तिमाहीत जीडीपी ४१.२ टक्के म्हणजे जवळपास ४२ टक्के खाली गेला आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा निचांक आहे असं सिंगापूरच्या वाणिज्य व्यापार मंत्र्यांनी म्हटलं आहे. जीडीपी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होणं हेच दाखवतंय की सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेवर करोनाचा गंभीर परिणाम झाला आहे.

जागतिक व्यापाराच्या दृष्टीने निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. सिंगापूरमध्ये अंशतः लॉकडाउन आहे. तरीही घाऊक आणि किरकोळ व्यापारावर त्याचा परिणाम मागील तीन महिन्यात झाला आहे असंही स्पष्ट झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:03 pm

Web Title: singapore gdp fall down 42 percent its record break fall scj 81
Next Stories
1 राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं
2 करोना रुग्णाची पान मसाल्याची तलफ मित्राच्या कुटुंबाला पडली महागात, रुग्णालयातून पळ काढला आणि….
3 आज लागणार CBSE दहावीचा निकाल
Just Now!
X