अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीआधी सुरक्षा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठीच कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी गुरख्यांवर सोपवण्यात आली आहे. येत्या महिन्याअखेरीस सिंगापूरमध्ये ही बहुचर्चित भेट होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपाळी गुरख्यांचा जगातील सर्वाधिक घातक सैनिकांमध्ये समावेश होतो. त्यासाठीच या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ट्रम्प आणि किम दोघेही स्वत:ची व्यक्तिगत सुरक्षा पथके सोबत घेऊन येणार आहेत. सिंगापूर पोलिसांनी भेटीचे ठिकाण, रस्ता आणि हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या गुरखा पथकावर सोपवली आहे.

सिंगापूरमध्ये गुरख्यांचा वावर फारसा जाणवत नाही. मागच्या आठवडयात शांगरीला हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस आणि अन्य मंत्री उपस्थित होते. त्यावेळी या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी गुरखा बटालियन संभाळत होती. खास नेपाळमधून सिंगापूर पोलीस दलात या गुरख्यांची भरती करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी तैनात असताना त्यांच्याकडे बेल्जियम बनावटीची असॉल्ट रायफल आणि पिस्तुल असते. गुरख्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र असली तरी कुकरी हे त्यांचे पारंपारिक शस्त्रही गुरख्याकडे असतेच. कुकरी म्हणजे धारदार चाकू. कुकरी शिवाय गुरखे युद्धाची तयारी करत नाहीत. एकप्रकारे कुकरी शिवाय गुरखे अपूर्णच असतात. हे नेपाळी गुरखे आता ट्रम्प-किमची सुरक्षा संभाळणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singapore nepal gurkhas to guard trump kim summit
First published on: 05-06-2018 at 15:23 IST