देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ०५० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ५२ हजार ०५० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ८०३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं साडेअठरा लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जण करोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, देशात ५ लाख ८६ हजार २९८ अॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे ३८ हजार ९३८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. भारतातील करोना चाचणीने दोन कोटींचा पल्ला ओलांडला आहे. दोन ऑगस्टपर्यंत भारतात दोन कोटी दोन लाख दोन हजार ८५८ करोना चाचणी झाल्या आहेत. रविवारी भारतात तीन लाख ८१ हजार २७ करोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.