25 February 2021

News Flash

देशातील १८ लाखांहून अधिक करोनाबाधितांपैकी ११ लाख ८६ हजार २०३ जण करोनामुक्त

देशात तीन कोटींपेक्षा जास्त करोना चाचण्या

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.

देशात दिवसाहणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मागील २४ तासांत देशात ५२ हजार ९७२ जणांना करोना विषाणूची लागण झाली होती. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे.  देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ जणांनी करोनावर मात केली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ५२ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात पाच लाख ७९ हजार ३५७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ३८ हजार १३५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. भारतातील करोना चाचणीने दोन कोटींचा पल्ला ओलांडला आहे. दोन ऑगस्टपर्यंत भारतात दोन कोटी दोन लाख दोन हजार ८५८ करोना चाचणी झाल्या आहेत. रविवारी भारतात तीन लाख ८१ हजार २७ करोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राज्यस्थानसारख्या राज्यात करोनाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांत ९ हजार ५०९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत रुग्णांची संख्या १५ हजार ५७६ इतकी झाली आहे. . राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून यामधील सर्वाधिक केसेस पुण्यात आहेत. पुण्यात सध्या करोनाचे ४४ हजार २०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 10:09 am

Web Title: single day spike of 52972 positive cases 771 deaths in india in the last 24 hours nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 चीनने लडाखच्या दिशेने तैनात केली अण्वस्त्र हल्ला करु शकणारी H-6 बॉम्बर विमाने
2 सीएएविरोधातील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी आरएसएसची नवी ‘सुपरमार्केट’ नीती
3 मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण
Just Now!
X