देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. देशात आतापर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ६२ हजार ६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात एक हजारांहून आधिक मृत्यू झाल्यामुळे चिंतेचे वातावरण झाले आहे.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख १५ हजार ७५ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण आधिक आहे. देशात सहा लाख ३४ हजार ९४५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात ४४ हजार ३८६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Single-day spike of 62,064 cases and 1,007 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally rises to 22,15,075 including 6,34,945 active cases, 15,35,744 cured/discharged/migrated & 44,386 deaths: Ministry of Health pic.twitter.com/K3wcsEuAy5
— ANI (@ANI) August 10, 2020
देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्याशिवया, दिल्ली, तामिळनाडू, गुजराज, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यातही करोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार ९ ऑगस्ट २०२० रोजी चार लाख ७७ हजार २३ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात दोन कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. करोना चाचण्याचं प्रमाण वाढल्यामुळे देशातील रुग्णांची संख्यही झपाट्यानं वाढत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 9:56 am