द बीटल्सच्या यशात मोठा वाटा असलेले संगीत निर्माते जॉर्ज मार्टिन (वय ९०) यांचे निधन झाले. फिफ्थ बिटल म्हणून प्रसिद्ध असलेले मार्टिन यांनी ‘बिटल’ हा ब्रिटिश बँड लोकप्रिय केला होता. मार्टिन व त्यांचा मुलगा गाइल्स यांच्या वतीने अ‍ॅडम शार्प यांनी सांगितले की, सर जॉर्ज मार्टिन यांचे मंगळवारी निधन झाले. सहवेदना प्रकट करणाऱ्या सर्वाचे आम्ही आभार मानतो. सात दशकांची त्यांची कारकीर्द गाजली. ते सर्जनशील कलाकार होते. मार्टिन यांनी १९६२ मध्ये ‘द बिटल्स’शी करार केला होता, नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अनेकांनी मार्टिन यांच्या संगीत रचना नाकारल्या होत्या, त्यात डेकाचा समावेश होता. मार्टिन हे पियानोही वाजवित असत. शिर्ले बॅसे व सिला ब्लॅक यांच्यासमवेत त्यांनी काम केले होते. अनेक ग्रॅमी पुरस्कार व अ हार्ड डेज नाइटसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. १९९६ मध्ये त्यांना ‘नाईटहूड’ किताब मिळाला, तर १९९९ मध्ये ते रॉक अँड रोल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झाले.