News Flash

‘साहेब गाय घेऊन जायची आहे, मला पोलीस संरक्षण द्या’

ओमप्रकाश असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी गायींना सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी पोलिसांकडे प्रमाणपत्राची मागणी केली आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

देशभरात गोहत्यांवरुन होत असलेल्या मॉब लिचिंगच्या (जमावाकडून होणारी मारहाण) घटनांमुळे गाझियाबाद येथे सामान्य लोकांमध्ये दहशत आहे. येथील सिहानी गेट ठाणे क्षेत्रात असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एक बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या व्यक्तीला आपल्या २ गायी घूकना येथून बुलंदशहर येथील माकडी गावात घेऊन जायचे आहेत. त्यासाठी त्यांनी सोमवारी परवानगीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपले कुटुंबीय मॉब लिचिंगचे बळी पडतील, अशी भीती त्यांना आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ओमप्रकाश असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी गायींना सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी पोलिसांकडे प्रमाणपत्राची मागणी केली आहे. ठाण्याचे प्रभारी संजय पांडे यांनी त्यांना गायी घेऊन जाण्यास सांगितले असून त्यांना कोणत्याची अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातून असे कुठलेही प्रमाणपत्र वितरित केले जात नसल्याचे सांगितले आहे.

ओमप्रकाश यांच्याकडे दोन गायी आहेत. घरी काही काम सुरु असल्याने आपल्या गायी बुलंदशहरातील माकडी गावात न्यायचे असल्याचे ओमप्रकाश यांनी पोलीस ठाण्यात सांगितले. नुकताच बुलंदशहरात झालेल्या घटनांमुळे येथील लोकांमध्ये दहशत आहे. गाझियाबादसह इतर जागांवर गायी घेऊन जाताना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी आम्ही गायी घेऊन जात असताना लोक आम्हाला मारहाण करतील अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळेच पोलिसांनी आपल्याला प्रमाणपत्र दिल्यास आम्हाला गायी नेणे सोपे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 12:33 pm

Web Title: sir please provide police protection i have to go home with cow says retired person in bulandshahr
Next Stories
1 अटलजींना देशभरातून आदरांजली; जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्मृतीस्थळावर नेत्यांची रीघ
2 अंदमान निकोबारमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव
3 जादूटोण्याच्या संशयातून मुलानेच जन्मदात्या आईची केली हत्या
Just Now!
X