01 March 2021

News Flash

सीतेला रावणानं नाही रामानं पळवलं, गुजरातच्या पाठ्यपुस्तकात घोडचूक

सीतेचं अपहरण कोणी केलं ? असा प्रश्न विचारला तर लहान मूलसुद्धा रावण असं योग्य उत्तर देईल

सीतेचं अपहरण कोणी केलं ? असा प्रश्न विचारला तर लहान मूलसुद्धा रावण असं योग्य उत्तर देईल. मात्र गुजरातमध्ये बारावीच्या संस्कृत पुस्तकात या साध्या प्रश्नाचं उत्तर चुकवण्यात आलं आहे. रावणाने नाही तर रामाने सीतेचं अपहरण केल्याचं पुस्तकात छापण्यात आलं आहे.

पुस्तकातील १०६ क्रमांकाच्या पानावर एका परिच्छेदात ही चूक छापण्यात आली आहे. प्रभू रामाचा एक सुंदर फोटो आणि त्यासोबत त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत. यावेळी प्रभू राम लक्ष्मणला एक ह्रदयस्पर्शी संदेश देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यावेळी रामाने सीतेचं अपहरण केल्याची चूक छापण्यात आली आहे. संस्कृत साहित्याची ओळख करुन देणाऱ्या धड्यात ही चूक करण्यात आली आहे. हे पुस्तक फक्त इंग्लिश मीडिअम विद्यार्थ्यांसाठी होतं.

गुजरात स्टेट बोर्ड ऑफ स्कूल टेक्स्टबुक्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ नितीन पेठानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला आपल्याला याची काही कल्पना नसल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांनी आपली चूक मान्य केली. भाषांतरात ही चूक झाली असून रावणाऐवजी रामाचं नाव छापलं गेलं असं त्यांनी सांगितलं. गुजराती पुस्तकात ही चूक झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 1:06 pm

Web Title: sita abducted by ram in gujarat textbook
Next Stories
1 बोधगया स्फोटातील पाच दोषींना जन्मठेप
2 चंदा कोचर यांना सुट्टीवर पाठवलेलं नाही, ICICI बँकेकडून स्पष्टीकरण
3 आता डेन्मार्कमध्येही बुरखा, निकाब घालण्यावर बंदी
Just Now!
X