News Flash

गोवा, मणिपूर आणि मेघालयचा ‘फॉर्म्यूला’ कर्नाटकातही लागू व्हावा : सीताराम येचुरी

गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हाच नियम कर्नाटकातही लागू व्हायला हवा असं सीपीआयचे(एम) महासचिव सीताराम येचुरी म्हणाले आहेत. तसंच भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र रहावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यावर, भाजपाने माझा पक्ष फोडण्यासाठी कितीही दबाव आणला तरीही मी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडणार नाही असा विश्वास माजी पंतप्रधान देवेगौडांनी त्यांना दिला.

भाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर आणि मेघालयात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं नव्हतं. २०१७ मध्ये गोव्यात ४० जागांपैकी १७ जागा काँग्रेसकडे होत्या. मणिपूरमध्ये ६० जागांपैकी २८ जागा काँग्रेस जिंकली, तर मेघालयातही ६० पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिली नव्हती, त्यामुळे आता याच नियमांचं पालन व्हायला हवं असं ट्विटरद्वारे येचुरी म्हणाले.

येचुरी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या एका ट्विटचं उदाहरणही दिलं, ज्यामध्ये जेटलींनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी असं म्हटलं आहे. भाजपावर निशाणा साधताना, निवडणूक हारणं आणि सरकार बनवणं या कलेमध्ये भाजपा माहिर आहे असं ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 10:06 am

Web Title: sitaram yechury reaction on karnataka results says single largest parties werent invited to form government in goa manipur
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा
2 रविवारपासूनच सुरू होती काँग्रेस-जेडीएसमध्ये चर्चा, भाजपाला होता आत्मविश्वास
3 जरा सांगा मग, बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता? तेजस्वी यादवांचा नितीश कुमारांना टोला
Just Now!
X