News Flash

Article 370ः “काश्मीर नजरकैदेत, अमित शाह चुकीचं बोलत आहेत”

मग अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही हा मुद्दा होता.

संग्रहित छायाचित्र

पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तजा जावेद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माझी आई मेहबुबा मुफ्ती या दोन दिवसांपासुन पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना वकील वा अन्य कुणालाही भेटू दिले जात नाही. सगळे काश्मीर नजरकैदेत असल्यासारखी परिस्थिती आहे. उलट कुणालाही नजरकैद करण्यात आलेले नाही, अशी चुकीची माहिती अमित शाह देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तजा जावेद यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असुन त्यात इल्तजा जावेद म्हणाल्या की, कुणालाही बाहेर पडू दिले जात नाही. भीतीचे वातावरण तयार करण्यात आले आहे. मला वाटते की, काश्मीरमध्ये काय सुरू आहे ते माध्यमांना कळायला हवे. फारूक अब्दुल्लासह इतर नेत्यांना अटक केलेली नाही, असे गृहमंत्री सांगत आहेत. पण, खरं हे आहे की, सज्जाद लोन इमरान अन्सारी, माझी आई आणि ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

कलम ३७० हटवणे हा भाजपाचा जुना मुद्दा आहे, असे मोदी सरकार सांगत आहे. मग अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही हा मुद्दा होता. मात्र, वाजपेयी खुप मोठ्या मनाचे होते. ज्यांना काश्मीरींनी आपल्या आयुष्यात स्थान दिले होते. कलम ३७० हटवण्याचे श्यामाप्रसाद मुखर्जीचे स्वप्न त्यावेळीही होते. पण त्यांनी जम्हुरियत, इन्सानियत आणि काश्मीरियत या त्रिसुत्रीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. मग कलम ३७० हटवल्यानेच समस्या सुटतील असे मोदी सरकारला का वाटले? मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्याने काश्मीरला अविकसित ठेवले, असे आरोप केंद्र सरकार का करत आहे. जर हे सत्य होत तर भाजपाने पीडीपीसोबत का सरकार स्थापन केले. त्यावेळी कलम ३७० आणि ३५ ए हटवणार नाही, हे का मान्य केले, सवाल इल्तजा यांनी भाजपाला केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 1:53 pm

Web Title: situation in kashmir like house arrest shah talking wrong bmh 90
Next Stories
1 आपण आदरणीय आणि समर्पित नेत्याला गमावले आहे – मनमोहन सिंग
2 “मॅडम, मी मागील ४६ वर्षांपासून तुमच्या मागे धावतोय”; सुषमा स्वराज यांच्या पतीचे भावनिक पत्र
3 सुषमा स्वराज मदतीसाठी तत्पर असत, सरबजीत सिंह यांच्या बहिणीने सांगितली आठवण
Just Now!
X