News Flash

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर शाळकरी विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सहा जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर शाळकरी विद्यार्थ्यांना बसने चिरडलं आहे

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर शाळकरी विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सहा जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर शाळकरी विद्यार्थ्यांना बसने चिरडलं आहे. कन्नोज येथे हा आज सकाळी हा अपघात झाला. अपघातात सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांनी जवळच्याच रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील डिझेल संपलं असल्या कारणाने विद्यार्थ्यांची बस थांबली होती. यावेळी एका बसने विद्यार्थ्यांना चिरडलं ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 9:19 am

Web Title: six children died in bus accident on agra lucknow expressway
Next Stories
1 ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे नीरव मोदी – रिपोर्ट
2 मानसिक आजारांना विमा संरक्षण नाहीच!
3 दिल्लीच्या ‘पूर्ण राज्या’साठी ‘आप’चे आंदोलन
Just Now!
X