News Flash

आजोबा, तुम्हीसुद्धा?

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका ६३ वर्षीय वृद्धास महानगर दंडाधिकाऱ्यांनी सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या गुन्हेगाराच्या वयाचा विचार करून या निर्णयाविरोधात दाद

| April 3, 2013 03:31 am

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका ६३ वर्षीय वृद्धास महानगर दंडाधिकाऱ्यांनी सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या गुन्हेगाराच्या वयाचा विचार करून या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयाने त्यांना ३० दिवसांची मुदत दिली.
महानगर दंडाधिकारी त्यागीता सिंग यांच्यासमोर ही सुनावणी झाली. उत्तम नगर परिसरात राहाणाऱ्या राजेश मुंजाळ या ६३ वर्षीय आरोपीवर शेजारी राहाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. उभय पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सिंग यांनी हा निर्णय दिला. या घटनेतील आरोपी ज्येष्ठ नागरिक आहेत, मात्र यातील गांभीर्य लक्षात घेता, आरोपीला सहा महिने साध्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येत आहे, या शिक्षेला आव्हान देण्याची संधी त्यांना मिळावी, यासाठी त्यांची शिक्षा ३० दिवसांनी अमलात येईल, असा निकाल त्यांनी दिला.
नेमके काय घडले?
मुंजाळ यांच्या शेजारी राहाणारी १३ वर्षांची मुलगी खेळताना गच्चीवर आल्यानंतर त्यांनी तिचा विनयभंग केला. आणखी काही करण्यापूर्वी तेथे तिचा भाऊ आल्याने मुंजाळ यांनी तेथून पोबारा केला. या मुलीने आपल्या वडिलांना तीन दिवसांनी ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुंजाळ यांनी हे आरोप फेटाळत आपल्याला यात गोवण्यात आल्याचा आरोप केला. या मुलीच्या वडिलांनी आपल्याकडून ५०हजार रुपयांचे कर्ज घेतल्याने व ते फेडण्याची इच्छा नसल्याने त्यांनी हे कुभांड रचले, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने मात्र साक्षी-पुराव्यांनंतर हा युक्तिवाद फेटाळून लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:31 am

Web Title: six month jail to one older man for missbehave with minorgirl
Next Stories
1 टीव्ही स्क्रीनवर आता ‘दृश्यगंध’ अनुभव!
2 राहुल यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह
3 मोदींच्या सत्कारासाठी स्टेडियम नाकारले
Just Now!
X