14 August 2020

News Flash

दोन भावांनी केली एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या; तलवार अन् कुऱ्हाडीने केले सपासप वार

दोन कुटुंबांतील वाद विकोपाला गेला अन् त्यामध्ये दोन जणांनी एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली.

दोन कुटुंबांतील वाद विकोपाला गेला अन् त्यामध्ये दोन जणांनी एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. मध्य प्रदेशमधील मंडला जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन जणांनी तलवार आणि कुऱ्हाडीने सपासप वार करत एका कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. या घटनेत इतर काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मंडला जिल्ह्यातील मनेरी गावांत काल सायंकाळी ही घटना घडली. घटनास्थळावर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिस अधिक्षक विक्रमसिंह कुशवाह म्हणाले की, ‘आतापर्यंत सहा लोकांच्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या हल्ल्यात कुटुंबातील अन्य काही सदस्याही जखमी झाले आहेत.’

मृत्यू झालेल्यामध्ये दोन लहानग्यांचाही समावेश आहे. विनोद सोनी (४५), त्याचा मुलगा ओम सोनी (१०), करिया सोनी (८), विनोदचा मोठा भाऊ राजेन्द्र सोनी (६२), राजेन्द्रची मुलगी रानू सोनी (२५) आणि दिनेश सोनी यांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विनोद सोनी भाजपा कार्यकर्ता होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या सहा जणांची हत्या हरिश सोनी आणि त्याचा लहान भाऊ संतोष सोनी यांनी केली आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत या घटनेबाबत दुख व्यक्त केलं आहे. कमलनाथ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 11:25 am

Web Title: six of a family killed during clash in madhya pradesh police nck 90
Next Stories
1 भारत आमचा महत्त्वपूर्ण भागीदार : अमेरिका
2 करोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना मिळणार 15 हजार रुपये, ‘या’ राज्याचा निर्णय
3 भारतात करोनाचा उद्रेक; २४ तासांतील सर्वाधिक वाढ
Just Now!
X