22 January 2021

News Flash

सहा राज्यांच्या सीमा आणि २७०० किमीचा प्रवास करुन आजारी मुलाला भेटायला पोहचली आई

आईचं काळीज काय असतं तेच या उदाहरणावरुन स्पष्ट झालं आहे

प्रतीकात्मक छायाचित्र

आई आपल्या मुलासाठी काहीही करु शकेल असं कायमच म्हणतात. आपण समाजात अशी उदाहरणंही पाहिली आहेत. करोनाच्या संकटात अशाच एका आईने सहा राज्यांच्या सीमा ओलांडून २७०० किमीचा प्रवास आपल्या आजारी मुलासाठी केला आहे. देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे केरळमध्ये अडकेल्या आईने २७०० किमीचा प्रवास आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी केला.

लॉकडाउन असतानाही ही आई प्रवास करु शकली ती केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी उपलब्ध करुन दिलेल्या पासमुळे. तीन दिवसात या आईने आपल्या मुलाला भेटण्यासाठी सहा राज्यांच्या सीमा ओलांडल्या आणि २७०० किमीचा प्रवास केला. तिच्यासोबत तिची सून आणि एक नातेवाईकही होता. तिच्या मुलाला स्नायूंशी संबंधित आजार झाला. या बाईंचा मुलगा फेब्रुवारी महिन्यात घरी आला होता. तो BSF मध्ये कार्यरत आहे. सुट्टीवरुन परतल्यावर तो आजारी झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं त्याच्या आईला समजलं तेव्हा आईने त्याला भेटण्यासाठी सहा राज्यांच्या सीमा ओलांडत २७०० किमीचा प्रवास केला.  इंडिया.कॉमने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:21 pm

Web Title: six states three days 2700 km kerala woman travels to rajasthan to meet ailing son scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 उतावळा नवरा… लग्न करण्यासाठी ८५० किमीचे अंतर कापून सायकलवरुन आला; पण…
2 VIDEO: भारतातलं हे राज्य करोनाला रोखण्यात यशस्वी
3 आईची माया…रुग्णालयात दाखल मुलाला भेटण्यासाठी सहा राज्यांमधून २७०० किमीचा प्रवास
Just Now!
X