कोरोनाला घाबरु नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अशात कोरोनाचा कहर हा देशभरात पाहण्यास मिळतो आहे. उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. कालच दिल्लीत एक आणि तेलंगणमध्ये एक असे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आज कोरोनाचा कहर देशभरात जाणवतो आहे. कोरोना व्हायरसचे सहा संशयित उत्तर प्रदेशात आढळले आहेत. एक संशयित नाशिकमध्ये आढळला आहे. या सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दिल्लीत काल कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर तेलंगणमध्येही एक रुग्ण आढळला. या दोघांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जयपूरमध्ये एक संशयित आढळला होता. आज नाशिकमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे. या रुग्णाच्याही रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.