उत्तर प्रदेशात सहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. घटनेला चार दिवस झाल्यानंतरही पोलीस अद्याप आरोपींना अटक करु शकलेले नाहीत. दरम्यान पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच प्रसिद्ध केले आहेत.
मुलीचं तिच्या घराबाहेरुनच अपहरण करण्यात आलं होतं. एका दुचाकीस्वाराने तिला उचलून नेलं होतं. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झाडीत मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडली.
आणखी वाचा- धक्कादायक: अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन जणं ताब्यात
मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं निष्पन्न झालं. मुलीला मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी मुलीची प्रकृती स्थिर असून सध्या कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे. “मुलीला बराच वेळ रुग्णालयात ठेवावं लागणार आहे. तिच्यावर अजून काही सर्जरी कराव्या लागतील,” असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा- …आणि सासरेच जावयाचं कापलेलं मुंडकं घेऊन पोहोचले पोलीस ठाण्यात
मुलीची प्रकृती स्थिर असली तरी तिचा जबाब घेणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र तिने आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच तयार करण्यात आले असून आम्ही लवकरच त्यांना अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 1:07 pm