22 November 2017

News Flash

‘त्या’ आरोपीच्या हाडांची चाचणी घ्या – अलका लांबा

अल्पवयीन ठरविण्यात आलेल्या या आरोपीच्या हाडांची चाचणी घेऊन त्याच्या वयाची सत्यता पडताळण्यात यावी, अशी

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: January 29, 2013 7:44 AM

देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील सहावा आरोपी अल्पवयीन ठरल्याने त्याच्या सुटकेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर राजकीय वर्तुळातही या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पवयीन ठरविण्यात आलेल्या या आरोपीच्या हाडांची चाचणी घेऊन त्याच्या वयाची सत्यता पडताळण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात ‘त्या’ आरोपीचे वय १७ वर्षे सहा महिने आणि २४ दिवस दिले आहे. तसेच अल्पवयीन न्यायिक आयोगानेही त्याच्या शाळेच्या दाखल्यावरून तो अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. मात्र बलात्कारासारखे क्रूर कृत्य करणाऱ्या या आरोपीच्या वयाची सत्यता पडताळण्यासाठी त्याच्या हाडांची चाचणी का घेण्यात आली नाही, असा प्रश्न लांबा यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्याचे योग्य वय जाणून घेण्यासाठी शास्त्रीय आधार घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

First Published on January 29, 2013 7:44 am

Web Title: sixth accused in delhi gang rape case must undergo bone test alka lamba