24 September 2020

News Flash

वीरभद्र सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा ‘सहावा डाव’

शिमला : हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाबाहेर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात

| December 26, 2012 03:51 am

शिमला : हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाबाहेर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ऊर्मिला सिंग यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८ जागांपैकी ३६ जागांवर विजय मिळाला होता.  वीरभद्र सिंग यांच्या मंत्रिमंडळात सध्या १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून या मंत्र्यांनाही मंगळवारी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्र्यांपैकी सुजनसिंग पठानिया, ठाकूरसिंग भारमौरी, मुकेश अग्निहोत्री, सुधीर शर्मा, प्रकाश चौधरी आणि धनीराम शांडिल या वीरभद्र सिंग यांच्या समर्थकांचा समावेश आहे, तर विद्या स्टोकस, कौलसिंग ठाकूर आणि जी. एस. बाली या त्यांच्या विरोधकांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2012 3:51 am

Web Title: sixth time cm veerbhadra singh of himachalpradesh
टॅग Congress
Next Stories
1 म्यानमारमध्ये विमान रस्त्यावर
2 दूरदर्शनचे पाच कर्मचारी निलंबित
3 नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी
Just Now!
X