मानवी त्वचेवर नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या एका विशिष्ट रसायनामुळे मानवी शरीर डासांसारख्या रक्तशोषक कीटकांना ‘अदृश्यमान’ होऊन आपला बचाव होतो़ डासांची वासावरून लक्ष्य ठरविण्याच्या क्षमतेला या रसायनाने प्रतिबंध केला जातो, असे नवे संशोधनात आढळून आले आह़े
‘अमेरिका केमिकल सोसायटी’च्या बैठकीत संशोधकांनी डासांची गंधाद्वारे लक्ष्य करण्याची क्षमता नष्ट करणारे संयुग असल्याचा दावा केला़ डासांना प्रतिबंध करण्यासाठी डासांसाठी तिरस्कार्ह गंधाचा वापर करण्याची पद्घत जुनी आह़े ‘डीट’ नावाचे तिरस्कार्ह गंधाचे रसायन सर्वाधिक प्रमाणात वापरले जात़े परंतु, त्याचा गंध काही लोकांना आवडत नाही, असेही या वेळी अमेरिकेच्या कृषी विभागाचे संशोधक उल्रिच बेर्निअर यांनी सांगितल़े
डासांच्या गंधाच्या क्षमतेत गोंधळ उडवून देण्यासाठी नवी पद्घत आम्ही शोधत आहोत़ डासांना त्याचे अन्न तयार आहे हेच कळले नाही, तर ते जमिनीवर उतरणार नाहीत़ आणि डंखही करू शकणार नाही़ मादी डास १०० फूट लांबूनच मानवी गंधाचा माग काढू शकतात़
अमेरिकेतील कृषी विभागातील डास आणि उडते कीटक विभाग आणि गेनव्हिला येथील वेटरिनरी इटोमोलॉजी विभागात १९४० सालापासून डासांना थोपविण्याच्या विविध उपायांवर संशोधन करीत आह़े
संशोधकांनी डासांची गंधाद्वारे लक्ष्य करण्याची क्षमता नष्ट करणारे संयुग असल्याचा दावा केला़ डासांना प्रतिबंध करण्यासाठी डासांसाठी तिरस्कार्ह गंधाचा वापर करण्याची पद्घत जुनी आह़े
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 12:15 pm