भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारस पाकिस्तानमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज २००० विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एक ट्विटर हॅण्डल चांगलेच चर्चेत आले आहे. हे ट्विटर हॅण्डल अधिकृत नसले तरी त्यांनी केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

प्राथमिक वृत्तानुसार पहाटे साडेतीन वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत हा हल्ला केला. २१ मिनिटांमध्ये काही शे किलोमीटरचा परिसरामध्ये बॉम्ब हल्ले करत अनेक दहशतवादी ठिकाणी उद्धवस्त करण्यात आली. मात्र या हल्ल्याच्या तीन तास आधी पाकिस्तान डिफेन्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ‘निवांत झोपा कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’, असे ट्विट करण्यात आले होते. या ट्विटर हॅण्डलच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी या हॅण्डलच्या बायोमध्ये डिफेन्स डॉट पिओके या वेबसाईटचा उल्लेख करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये पुढे पाकिस्तान जिंदाबाद हा हॅशटॅगही वापरण्यात आला.

रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी हे ट्विट करण्यात आल्यानंतर अवघ्या साडेतीन तासात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. त्यामुळे आता या ट्विटवरुन पाकिस्तानी हवाई दलाला तसेच पाकिस्तानलाही ट्रोल केले जात आहे. पाहुयात या ट्विटवरील उत्तरे…

ट्विट करुन झोपले…

पिक्चरच झाला आज

खोटारडे

हे होणारच होतं

ते स्वत: पण झोपले

भारतीय वायुसेनेनेच झोपवले

दरम्यान हे ट्विटर हॅण्डल नक्की कोण चालवते याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेले नसली तरी ‘निवांत झोपा आम्हा जागे आहोत’ असं पाकिस्तानी हवाई दलाच्या नावाने ट्विट करण्यावरुन भारतीयांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.