चीनच्या बाजारपेठेत लवकरच ए-४ आकाराच्या कागदाचे घडी करता येण्यासारखे ड्रोन विमान उपलब्ध होणार आहे. अहेडएक्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ली झियाओयू यांनी सांगितले, की ही ड्रोन विमान सामान्य ग्राहकांसाठी असतील व ती पाच वर्षांत ही बाजारपेठ ६७.३ अब्ज डॉलर्सची असेल.
या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात स्पर्धा आहे. ट्रान्सड्रोन ए ४ असे या ड्रोनचे नाव असून ते पारंपरिक ड्रोनपेक्षा वेगळे आहे त्याचा आकार २८८ बाय २०४ बाय ७१ मि.मी. असेल असे ‘पीपल्स डेली’ने म्हटले आहे.
ड्रोनची रचना बदलता येते व त्यामुळे त्याचा आकार ए-४ कागदाइतका ठेवता येतो त्याची घडी करता येते. या ड्रोन विमानाचे वजन १५०० ग्रॅम असून ते कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकतो, प्रतिकूल परिस्थितीतही ते चालू शकते.
त्यात व्यावसायिक कॅमेरे
बसवता येतात व ते मोबाइल
फोन जोडता येतात व त्यात वायफायही वापरलेलेल असते. अतिशय उच्च विवर्तनाच्या
प्रतिमा त्याच्या मदतीने तयार
करता येतात.

ट्रान्सड्रोन ए-४
’ए-४ कागदाच्या आकारासारखे विमान घडी करता येते
’कॅमेरे जोडून ते मोबाइल फोनने नियंत्रित
’लहान ड्रोनची बाजारपेठ ६७.३ अब्ज डॉलर्सची