आपल्या आकाशगंगेभोवती साधारण हजार ताऱ्यांचा कृष्णद्रव्याने बांधला गेलेला एक समूह फिरत असून ती आतापर्यंत शोधली गेलेली सर्वात लहान दीर्घिका आहे. एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह इतर वैज्ञानिकांनी ती शोधून काढली आहे. हे संशोधन करणाऱ्यात मायकेल बॉयलन-कोलशिन व भारतीय वंशाचे मनोज कापलिनघाट, ज्यूडिथ कोहेन, मार्ला गेहा यांचा सहभाग होता हे संशोधन अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
‘लाइव्ह सायन्स’ या नियतकालिकाने म्हटले आहे की, या बटू दीर्घिकेचे नाव सेग्यू २ असे आहे. एम डेक वेधशाळेतील अतिशय शक्तिशाली दुर्बिणींनी या दीर्घिकेचे मापन करण्यात केले असून ही दीर्घिका म्हणजे उंदरापेक्षा लहान हत्ती शोधण्यासारखे आहे असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विश्वरचना वैज्ञानिक जेम्स बुलक यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षे खगोलवैज्ञानिक अशा प्रकारच्या बटू दीर्घिकेच्या शोधात होते, ती आकाशगंगेच्या सभोवताली फिरत असावी असे त्यावेळी सांगण्यात आले होते. ही दीíघका सापडली नसती तर आपण विश्वाच्या रचना निर्मितीबाबत मांडलेले सिद्धांत कदाचित सदोष ठरले असते, पण आता ते कोडे सुटले आहे असे ते म्हणाले.
सेग्यू २ या दीर्घिकेचे अस्तित्व हे हिमनगाचे एक टोक आहे अशा कमी वस्तुमानाच्या अनेक बटू दीर्घिका असू शकतील. फक्त आपल्या निरीक्षण मर्यादांमुळे आपल्याला त्या सापडलेल्या नाहीत. ती दीर्घिकाच आहे तारकापुंज नाही असे संशोधन निबंधाचे प्रमुख लेखक इव्हान किर्बी यांनी म्हटले आहे. तारे हे कृष्णद्रव्यामुळे एकत्र बांधलेले राहतात, जणू तो अवकाशातील डिंक असतो, त्याच्या अस्तित्वाशिवाय आपण संबंधित घटक हा दीर्घिका आहे असे म्हणू शकत नाही. सिग्यू ही दीर्घिका २००९ मध्ये स्लोन डिजिटल स्काय सव्‍‌र्हे अंतर्गत शोधली असून ती सर्वात फिकट दीर्घिका आहे, आपल्या सूर्यापेक्षा तिचा प्रकाश ९०० पटींनी कमी आहे.
आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत ती फारच किरकोळ असून आपली आकाशगंगा २० अब्ज पटींनी अधिक प्रकाशमान आहे. तिचे वजन हे अगोदर अंदाज केल्यापेक्षा १० पटींनी कमी आहे.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?