22 November 2019

News Flash

‘स्मार्ट सिटी’वरून भाजप खासदाराचीच टीका!

पंतप्रधानांच्या उपस्थितीतच भोलासिंह यांचा मारा थोपविण्याची नायडू यांच्यावर वेळ

पंतप्रधानांच्या उपस्थितीतच भोलासिंह यांचा मारा थोपविण्याची नायडू यांच्यावर वेळ
स्थानिक स्वराज्य संस्थांनी जे काम आधीच हाती घेतले आहे त्यापेक्षा स्मार्ट सिटी योजनेचे वेगळेपण काय आहे, आधीच विकसित असलेली शहरेच विकसित केली जाणार असून त्यामुळे असंतुलन वाढणार नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती भाजपचे खासदार भोलासिंह यांनी बुधवारी लोकसभेत केली. तसेच मोदी यांनी एका भाषणात पूर्वेकडे मेंदू आहे आहे तर पश्चिमेकडे मेंदूचा अभाव आहे, परंतु पैसा आहे, असे सांगितल्याचा दावा केला तेव्हा केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यावर हा प्रश्नांचा आणि अप्रत्यक्ष टीकेचा मारा रोखण्याचा प्रयत्न करावा लागला.
प्रश्नोत्तराच्या तासाला खासदार भोलासिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा विरोधकांची कसर ते जणू भरून काढत आहेत, असेच चित्र होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात यावेळी उपस्थित होते.
पूर्वेकडे मेंदू आहे तर पश्चिमेकडे मेंदूचा अभाव आहे, असे मोदी कधीही म्हणालेले नाहीत, असा दावाही नायडू यांनी केला. माहितीबाबत सर्व प्रदेश परिपूर्ण आहेत, असेही ते म्हणाले.

केरळची सोमालियावर तुलना केल्याने मोदींवर टीका
केरळमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी केरळची तुलना सोमालियाशी केल्याने समाजमाध्यमांत ‘गेट लॉस मोदी’ हा हॅशटॅग अग्रभागी होता. नेटकरांनी मोदी यांच्या या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. साक्षरता, सरासरी जीवनमान, आरोग्य सुविधा, स्वच्छता यात केरळ देशात पहिल्या स्थानी तर गुजरात दहाव्या स्थानापुढे असल्याची जाणीवही नेटकरांनी करून दिली.

First Published on May 12, 2016 3:08 am

Web Title: smart city bjp
टॅग Smart City
Just Now!
X