News Flash

उल्कापाषाणाचा शोध घेण्यासाठी मोफत स्मार्टफोन अ‍ॅप

आकाशातून येणारे अग्निगोल व उल्का तसेच उल्कापाषाण यांचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी एक स्मार्टफोन अ‍ॅप तयार केले आहे.

| December 3, 2013 01:02 am

आकाशातून येणारे अग्निगोल व उल्का तसेच उल्कापाषाण यांचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी एक स्मार्टफोन अ‍ॅप तयार केले आहे. फायरबॉल्स इन द स्काय असे या उपयोजनाचे नाव असून ते कर्टिन विद्यापीठातील एका प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आले आहे. पृथ्वीवर पडणारे उल्कापाषाण शोधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. पेटती उल्का जेव्हा दगडाच्या स्वरूपात पृथ्वीवर विसावते तेव्हा त्याला उल्कापाषाण असे म्हणतात. कॅमेऱ्याच्या मदतीने उल्का व अग्निगोलांचा माग घेण्यासाठी तयार केलेल्या या अ‍ॅपमध्ये थॉट वर्कस व क्युरटिन जिओसायन्स आउटरीच यांचे संयुक्त सहकार्य आहे. डेझर्ट फायरबॉल  प्रकल्पाचे प्रमुख  प्रा. फिल ब्लँड यांनी सांगितले की, या अ‍ॅपचा उपयोग जगात कुणीही करू शकेल व उल्कापाषणांविषयी माहिती घेऊ शकेल. हे अ‍ॅप मोफत . त्यात तुम्हाला जिथून उल्का कोसळताना दिसते आहे त्या दिशने तुमचा मोबाईल फोन वळवायचा व क्लिकचे बटन दाबायचे. जर आपल्याला अशी अनेक उल्कांची निरीक्षणे मिळाली तर त्यांचा मार्गही समजेल तसेच तुम्ही पाहिलेला अग्निगोल, उल्का कुठून आला होता लघुग्रहाच्या पट्टय़ातून की धुमकेतूमधून तेही समजू शकेल. अग्निगोल जेव्हा आपण कॅमेऱ्यात टिपू तेव्हा त्यांचे छायाचित्र प्रकाशाने उजळत असलेल्या पट्टय़ासारखे दिसेल त्यावरून गणिती तंत्र वापरून त्या उल्कापाषणाची कक्षा व तो कुठे पडला हे जाणून घेता येईल. स्मार्टफोनच्या मदतीने उल्कापाषाणांबाबत पुरेशी व विश्वासार्ह माहिती संकलित करण्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:02 am

Web Title: smartphone app to id fireballs
टॅग : Smartphone
Next Stories
1 आईने तान्हुल्याला धावत्या ट्रेनमधून फेकले
2 इशरत जहाँप्रकरणी सीबीआयचे पूरक आरोपपत्र
3 ‘माध्यमांचे फक्त मोदींकडे लक्ष; काँग्रेसकडे दुर्लक्ष’
Just Now!
X