07 March 2021

News Flash

राहुलजी जे ‘छोटा भीम’ला कळते ते तुम्हाला नाही समजत – स्मृती इराणी

आधार डाटाच्या सुरक्षेला भगदाड पडले.

स्मृती इराणी

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची छोटा भीमबरोबर तुलना केली. नरेंद्र मोदी अॅपवरुन आधार डाटाच्या सुरक्षेला भगदाड पडल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला स्मृती इराणी यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिले. राहुलजी अॅपवरुन सामन्यपणे जी परवानगी मागितली जाते ती हेरगिरी होत नाही, हे छोटया भीमलाही कळते असे टोला त्यांनी लगावला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नमो अॅपवरुन युझर्सची माहिती अमेरिकेतील एका कंपनीला देण्यात आली आहे असा आरोप राहुल यांनी केला होता. काँग्रेसचे अॅप डिलिट करणाऱ्या राहुल गांधी यांच्या टीमचीही स्मृती इराणींनी फिरकी घेतली. राहुलजी हे काय आहे ? तुम्ही जे सांगता त्या उलट तुमची टीम काम करते. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस अॅप डिलीट केले असे इराणी म्हणाल्या.

काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर डाटा चोरीचा आरोप करत असून दरम्यान काँग्रेसने प्ले स्टोअरमधून आपलं अॅप हटवलं आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख आमित मालवीय यांनी काँग्रेस पक्ष आपल्या अधिकृत अॅप आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून डाटा सिंगापूरमधील परदेशी कंपन्यांना विकत असल्याचा आरोप केला होता. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपुर्वीच राहुल गांधी सिंगापूरहून परतले आहेत. काँग्रेसने अॅप डिलीट केल्यानंतर भाजपाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसने डाटा चोरीच्या आरोपानंतर अॅप डिलीट केल्याने अमित मालवीय म्हणाले आहेत की, ‘काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत ? यांनी गुजरात निवडणुकीत लोकांचा डाटा चोरी करुन निवडणूक धोरण आखलं आणि आता कर्नाटकातही तेच करत आहेत’.

Next Stories
1 ‘भारतीय भाषांमुळे नेटकऱ्यांची संख्या २० कोटींनी वाढली’
2 अॅम्ब्युलन्समध्ये लघुशंका करण्यासाठी ड्रायव्हरने पेशंटला काढलं बाहेर
3 लाजिरवाणं : … तर पीएनबी बँकेवरच कर्जबुडवी असा शिक्का बसेल!
Just Now!
X