नवी दिल्ली : मुलांचे कुपोषण आणि वाढ खुंटण्याची समस्या यावर उपाययोजना करण्यापासून ते कार्यालयांमध्ये महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी नियमांचा मसुदा तयार करण्यापर्यंतची अनेक आव्हाने आता देशाच्या नव्या महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्यासमोर आहेत. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय खातेवाटपात त्यांच्याकडे या विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत केल्याने ‘जायंट किलर’ ठरलेल्या ४३ वर्षीय स्मृती इराणी या मोदी सरकारमधील सर्वात तरुण मंत्री आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात इराणी यांच्याकडे असलेले वस्त्रोद्योग खाते या वेळीही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांनी शुक्रवारीच कार्यभार स्वीकारला असला तरी, इराणी या खात्याची सूत्रे सोमवारी हाती घेण्याची शक्यता आहे. या विभागाच्या मंत्री म्हणून इराणी यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. यात देशातील बालसंगोपन केंद्रांची नोंदणी आणि अनैतिक मानवी व्यापार विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेणे ही प्रमुख आहेत. महिला आणि बालकल्याण खात्याचा कार्यभार यापूर्वी मेनका गांधी यांच्याकडे होता. इराणी यांच्याकडे यापूर्वी मनुष्यबळ विकास आणि माहिती प्रसारण खात्याची जबाबदारीही होती. दोन वर्षांतच त्यांच्या कारभाराविषयी वाद निर्माण झाल्याने त्यांच्याकडील मनुष्यबळ खाते काढून वस्त्रोद्योग खाते देण्यात आले होते. नवे केंद्रीय मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री ’*नरेंद्र मोदी - पंतप्रधान आस्थापना, सार्वजनिक तक्रार निवारण, अणुऊर्जा, अवकाश व अन्य * राजनाथ सिंह संरक्षण * अमित शहा गृह * नितीन गडकरी रस्ते-वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग आणि लघू-मध्यम उद्योग * सदानंद गौडा रसायन व खते * निर्मला सीतारामन अर्थ * रामविलास पासवान अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण * नरेंद्र सिंह तोमर कृषी, ग्रामीण विकास, पंचायत राज * रवीशंकर प्रसाद विधि व न्याय, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान * हरसिमरत कौर बादल खाद्यप्रक्रिया * थावरचंद गेहलोत सामाजिक न्याय सबलीकरण * एस जयशंकर परराष्ट्र * रमेश पोखरियाल निशांक मनुष्यबळ विकास * अर्जुन मुंडा आदिवासी कल्याण * स्मृती इराणी महिला व बाल कल्याण, वस्त्रोद्योग * डॉ. हर्ष वर्धन आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान, भूविज्ञान * प्रकाश जावडेकर पर्यावरण व वन, माहिती प्रसारण * पीयूष गोयल रेल्वे, वाणिज्य व उद्योग * धर्मेद्र प्रधान पेट्रोलियम, पोलाद * मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक * प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज, कोळसा-खाण * महेंद्रनाथ पांडे कौशल्य विकास * अरविंद सावंत अवजड उद्योग * गिरिराज सिंह पशू, दुग्ध, मत्स्य विकास * गजेंद्र सिंह शेखावत जलशक्ती राज्यमंत्री, स्वतंत्र कार्यभार * संतोष गंगवार कामगार व रोजगार * इंद्रजीत सिंह राव सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी * श्रीपाद नाईक आयुष, संरक्षण * डॉ. जितेंद्र सिंह दीक्षित पंतप्रधान कार्यालय, आस्थापना, अणुऊर्जा, अवकाश * किरन रिजिजू क्रीडा, युवा, अल्पसंख्य * प्रल्हाद पटेल सांस्कृतिक, पर्यटन * आर. के. सिंह ऊर्जा, कौशल्य विकास * हरदीप सिंह पुरी गृहनिर्माण व नागरी विकास, वाणिज्य व उद्योग * मनसुख मांडविया जहाजबांधणी, रसायन व खते राज्यमंत्री * फग्गन सिंह कुलस्थी पोलाद * अश्विनी कुमार चौबे आरोग्य व कुटुंब कल्याण * अर्जुन राम मेघवाल संसदीय कामकाज, अवजड व सार्वजनिक उद्योग * ज. (नि.) व्ही. के. सिंह रस्ते, वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग * कृष्णन पाल गुर्जर सामजिक न्याय व सबलीकरण * रावसाहेब दानवे ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा * जी किशन रेड्डी गृह * पुरुषोत्तम रुपाला कृषी * रामदास आठवले सामजिक न्याय व सबलीकरण * निरंजन ज्योती ग्रामीण विकास * बाबूल सुप्रियो पर्यावरण, वन * संजीव बलियान पशू, दुग्ध, मत्स्य विकास * संजय धोत्रे मनुष्यबळविकास, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान * सुरेश अंगाडी रेल्वे * अनुराग ठाकूर अर्थ, कंपनी व्यवहार * नित्यानंद राय गृह * रतनलाल कटारिया जलशक्ती, सामाजिक न्याय व सबलीकरण * व्ही. मुरलीधरन परराष्ट्र, संसदीय कामकाज * रेणुका सिंह आदिवासी विकास * सोम प्रकाश वाणिज्य व उद्योग * रामेश्वर तेली खाद्यप्रक्रिया * प्रताप चंद्र सारंगी लघू व मध्यम उद्योग, पशू, दुग्ध, मत्स्य विकास * कैलाश चौधरी- कृषी * देबश्री चौधरी महिला व बाल कल्याण