आज ‘व्हॅलेंटाइन डे’ आहे. व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिवस. अजूनही जे तरुण-तरुणी सिंगल आहेत म्हणजे ज्यांच्या आयुष्यात कोणी जोडीदार नाहीय त्यांच्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवरुन खास संदेश दिला आहे. संदेशाबरोबर स्मृती इराणी यांनी स्वत:चा सुंदर फोटोही पोस्ट केला आहे.

स्वत:वर प्रेम करण्यात दिवस घालवा. आपलं यश कशामध्ये आहे ते ओळखा. तुमचा आतापर्यंतचा प्रवास साजरा करा. स्वप्न बघायची हिम्मत ठेवा आणि कधी नाउमेद होऊ नका असे इन्स्टाग्राम संदेशात स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. या संदेशानंतर इन्स्टाग्रामवर अनेकांनी स्मृती इराणींनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

आज तुमचा फोटो पाहून मला तुलसीची आठवण झाली असे एका युझरने म्हटले आहे. स्मृती इराणी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट चर्चेचा विषय असतात. अलीकडे स्मृती इराणी त्यांच्या एका वक्तव्यावरून सोशल नेटवर्किंगवर ट्रोल झाल्या होत्या.

गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केले. प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची जबाबदारी सोपविली. मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मीदेखील निवृत्त होईन, अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केली. याच वक्तव्यावरून स्मृती इराणी ट्रोल झाल्या.