केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला शेरोशायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे. १३ तारखेला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीका केली होती. कवी दुष्यंत कुमार यांच्या ” भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली मे जेरे-बहस ये मुद्दा”

या ओळी ट्विट केल्या होत्या. जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला. यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट केले आहे. ‘ऐ सत्ता की भूख-सब्र कर, आँकडे साथ नहीं तो क्या खुदगर्जों को जमा कर, मुल्क की बदनामी का शोर तो मचा ही लेंगे’ असा ट्विट करत स्मृती इराणींनी उत्तर दिले आहे.

राहुल गांधी गुजरात दौऱ्यादरम्यान गुजरातच्या विकासाचा मुद्दा पुढे करत होते, त्यावेळीही अमित शहा, स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात अर्थात अमेठीमध्ये निशाणा साधला होता. राहुल गांधी आणि त्यांच्या तीन पिढ्यांनी अमेठीच्या विकासासाठी पावले उचलली का? मग आता ते गुजरातच्या विकासाच्या गप्पा का मारत आहेत? असे प्रश्न विचारत भाजपतर्फे राहुल गांधींवर  टीका केली होती. आता राहुल गांधी यांच्या ट्विटला त्यांच्याच भाषेत स्मृती इराणी यांनी उत्तर दिले.