30 September 2020

News Flash

स्मृती इराणी अपघातात जखमी

वृंदावन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमाहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला.

| March 6, 2016 03:23 am

स्मृती इराणी

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यमुना द्रुतग्रती मार्गावरील अपघातात किरकोळ जखमी झाल्या. वृंदावन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमाहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार एक दुचाकीस्वार स्मृती इराणींच्या ताफ्यातील वाहनावर आदळला. त्यात तो ठार झाला. अपघातात तीन सुरक्षा रक्षक तसेच चालक जखमी झाले. यामध्ये स्मृती इराणींच्या गुडघ्याला जखम झाली. अपघातानंतर दिल्लीला जाताना स्मृती इराणी यांनी काही जखमींना मदत केल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2016 3:23 am

Web Title: smriti irani injured in car accident on yamuna expressway
टॅग Smriti Irani
Next Stories
1 घृणा पसरवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवा!
2 दहशतवादी अब्दुल टुंडाची पुराव्याअभावी सुटका
3 याकूबच्या समर्थनार्थ वेमुलाकडून सभा!
Just Now!
X