News Flash

“क्योंकि बहू भी कभी टेनिस फैन थी…”; टेनिसचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत स्मृती इराणींचा फ्री हीट

स्मृती इराणी यांनी टेनिसपटू स्टेफी ग्राफचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच आपण सुद्धा टेनिसची फॅन असल्याचे सांगितले

इराणी यांनी टेनिसचा प्लेअरचा व्हायरल व्हिडीओ शेअर केला

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. अनेकदा त्या मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांनी टेनिसपटू स्टेफी ग्राफचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच आपण सुद्धा टेनिसची फॅन असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहला जात आहे.

स्मृती इराणी यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ स्टेफी आणि किमिको डेट यांच्या दरम्यान 1996 च्या उपांत्य-अंतिम सामन्यातील आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रेक्षकांमध्ये बसलेला एक माणूस स्टेफीला लग्नाची मागणी घालत आहे. त्यानंतर स्टेफी यावर उत्तर देते आणि त्या व्यक्तीला विचारते, आपल्याकडे किती पैसे आहेत? हा व्हिडिओ शेअर करताना स्मृती यांनी कॅप्शनमध्ये ‘क्योंकि बहू भी कभी टेनिस फैन थी’ असे लिहले आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

सोशल मीडियावर स्मृती इराणी अनेकदा चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील खास क्षण शेअर करत असेत. नुकताच स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी अभिनेता आणि टीव्ही होस्ट मनीष पॉल गेला होता. दरम्यान त्याला चहाऐवजी ‘काढा’ देण्यात आला होता. त्या दोघांनी सेल्फीही घेतला होता. जो जोरदार व्हायरल झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 4:31 pm

Web Title: smriti irani sharing viral video of tennis player on instagram srk 94
Next Stories
1 “बहुत हार्ड,” रोनाल्डोने कोका कोलाच्या बाटल्या हटवल्यानंतर फेव्हिकॉलची भन्नाट पोस्ट; नेटकरी फिदा
2 खोदकाम करताना सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा; हिऱ्याचा आकार पाहून थक्क व्हाल
3 २ लाख ७० हजार रुपये किलो… हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा
Just Now!
X