07 March 2021

News Flash

एसएमएसचे २१ व्या वर्षांत पदार्पण

एसएमएस म्हणजेच लघुसंदेश सुविधेला ३ डिसेंबरला एकवीस वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यानच्या काळात त्याच्या वापरात अनेक चढउतार आले तरी आता एसएमएस वापरण्याचे प्रमाण कमी होत

| December 3, 2012 02:25 am

एसएमएस म्हणजेच लघुसंदेश सुविधेला ३ डिसेंबरला एकवीस वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यानच्या काळात त्याच्या वापरात अनेक चढउतार आले तरी आता एसएमएस वापरण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. अगदी बहुराष्ट्रीय करारांपासून प्रेमाची फुलबाग फुलवण्यापर्यंत अनेक करामती करणाऱ्या या एसएमएसच्या वापराचे प्रमाण कमी झाले आहे असे काही पाहणी अहवालांमधून दिसून आले आहे. त्यामुळे यंदाचा एकविशीतील एसएमएस ओ माय गॉड (ओएमजी)असावा अशी स्थिती आहे.
जगातील पहिला एसएमएस संदेश ‘मेरी ख्रिसमस’ असा होता व तो एका व्यक्तिगत संगणकावरून ३ डिसेंबर १९९२ रोजी मोबाईल फोनवर पाठवला गेला होता. त्यानंतर १९९८ मध्ये इंग्लंडमध्ये चार प्रमुख मोबाईल फोन कंपन्यांनी एसएमएस सेवेत काही सवलती दिल्यानंतर या संदेशांच्या वापराचे प्रमाणही चांगलेच वाढले होते. आता जगातील चार अब्ज लोक एसएमएस म्हणजे शॉर्ट मेसेजिंग सव्‍‌र्हिसचा वापर करतात, पण एसएमएसच्या जन्मापासूनचा काळ बघितला तर अलीकडेच त्याच्या वापराचे प्रमाण कमी होताना दिसत आहेत.
ऑफकॉम या माध्यम नियंत्रकांच्या मते इंग्लंडमध्ये एसएमएसचे प्रमाण एक अब्जांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये ३९.७ अब्ज एसएमएस पाठवले गेले, पण या वर्षी हे प्रमाण ३८.५ अब्ज इतके खाली घसरले आहे. अमेरिकेतही हाच कल असून एसएमएस वापराचे प्रमाण कमी झाले आहे. ‘द इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राने ऑफकॉमचे संचालक जेम्स थिकेट यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मोबाईल फोनच्या इतिहासात प्रथमच एसएमएसचे प्रमाण कमी होत आहे.
सोशल नेटवर्किंग, तत्काळ संदेश सेवा यामुळे लोक कमी एसएमएस पाठवतात. असे असले तरी ते यापूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवित आहेत, असे थिकेट यांचे मत आहे. तांत्रिक बदल इतके झपाटय़ाने होत आहेत की, आणखी वीस वर्षांनी आपण कशा पद्धतीने संदेशवहन करीत असू याचा अंदाज करणे कठीण आहे. असे असले तरीही गेली दोन दशके एसएमएसने राज्य केले असे म्हणता येईल.    
वापर घटण्याची कारणे
* सोशल नेटवर्किंगचा जास्त वापर
* इन्स्टंट मेसेजिंगचा वापर
* पहिला एसएमएस संदेश- मेरी ख्रिसमस ( ३ डिसेंबर १९९२)
* १९९८ मध्ये एसएमएसचा वापर जोरात
* सध्या अमेरिका व इंग्लंडसह अनेक देशात एसएमएस वापरात घट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 2:25 am

Web Title: sms celebrates its 21st birthday
Next Stories
1 मेंदूचे अधिक वास्तव प्रारूप
2 एका सभागृहाचा पाठिंबा ‘फेमा’साठी पुरेसा
3 लष्करप्रमुखांची भारत-चीन सीमेला भेट
Just Now!
X