‘झेड प्लस’ सुरक्षा कवचातून प्रवास करणारे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी ‘बुलेटप्रूफ’ नसलेल्या कारमधून विमानतळापर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागला. नेदुम्बासेरीमधील विमानतळ मार्गावर भागवत यांच्या ताफ्यातील संरक्षित वाहनाच्या सुकाणूत बिघाड झाल्याने त्यांना अन्य वाहनांतून प्रवास करावा लागला. सकाळी त्यांच्या विमानाचे उड्डाण असल्याने अत्यंत वेगाने अन्य वाहनाची व्यवस्था करावी लागली. या वेळी त्यांच्यासोबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान होते, असे पोलिसांनी सांगितले.