05 December 2020

News Flash

भारताला ‘गरीब’ म्हणणे स्नॅपचॅटच्या सीईओंना भोवले, मानांकनात घसरण

भारत आणि स्पेन सारख्या गरीब देशांसाठी हे अॅप नाही असे इव्हान यांनी म्हटले होते

भारतामध्ये स्नॅपचॅट वापरणाऱ्यांची संख्या ४० लाख आहे

स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल यांनी भारताबद्दल एका बैठकीमध्ये अनुचित उद्गार काढल्यामुळे भारतीयांनी स्नॅपचॅट अॅप अनइंस्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. स्नॅपचॅट हे अॅप श्रीमंतांसाठी आहे. भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये या अॅपचा विस्तार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही असे २०१५ साली झालेल्या एका बैठकीमध्ये इव्हान यांनी म्हटले होते. व्हरायटी या मॅगजिनने हे वृत्त दिले होते.

हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भारतामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जे लोक हे अॅप वापरत होते त्यांनी हे अॅप अनइंस्टॉल केले आहे तर ज्या लोक हे अॅप वापरत नव्हते त्यांनी सुद्धा स्नॅपचॅट हे अॅप आधी इंस्टॉल करुन त्यास डाऊनग्रेड करुन अनइंस्टॉल केले आहे. त्यामुळे स्नॅपचॅटच्या मानांकनात घसरण झाली आहे. भारत आणि स्पेनसारख्या मोठ्या बाजारपेठेत आपले अॅप म्हणावे त्या गतीने वाढत नाही अशी चिंता एका बैठकीच्या वेळी इव्हान यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती. आपल्याला गरीब देशांमध्ये विस्तार करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी म्हटले होते.

त्यांच्या या बैठकीची माहिती उघड झाल्यानंतर भारतामध्ये अनइंस्टॉल स्नॅपचॅट आणि बॉयकॉट स्नॅपचॅट असे ट्रेंड ट्विटरवर चालले. या वृत्तानंतर स्नॅपचॅटची गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरली आहे. स्नॅपचॅटचे माजी कर्मचारी अॅंथनी पॉम्पलियानो यांनी स्नॅपचॅट विरोधात एक खटला दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी हा प्रकार उघड केला. स्नॅपचॅटच्या प्रसारासाठी आपल्या युजर्सची संख्या इव्हान यांनी फुगवून सांगितली होती असे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या नियंत्रणाबाबत आपण चिंता व्यक्त केली होती. त्यावरुन आपले आणि कंपनीचे मतभेद झाले होते.

त्याच वेळी आपण राजीनामा दिला होता असे अॅंथनी यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत हा सर्वाधिक वेगाने वाढणारा देश आहे असे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे. २०२० पर्यंत भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत अडीच पट वाढ होणार आहे. भारतामध्ये स्नॅपचॅट वापरणाऱ्यांची संख्या ४० लाख आहे. भारतामध्ये हे अॅप ट्विटर आणि फेसबुकच्या तुलनेत प्रसिद्ध नाही. इव्हान यांच्या वक्तव्याचा फटका कंपनीला बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 3:00 pm

Web Title: snapchat ceo evan speigel snapchat down graded by indians on play store
Next Stories
1 विमान अपहरणाचा कट; मुंबई, चेन्नईसह तीन विमानतळांवर हायअलर्ट
2 काश्मिरी जनतेला सैन्य आणि दहशतवादी दोघेही मारतात; दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य
3 काश्मीरमधील दंगेखोरांना पाकिस्तानकडून ‘कॅशलेस फंडिंग’
Just Now!
X