जम्मू-काश्मीरमधील भदेरवाह डोंगराळ भागांत शनिवारी या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. कैलास पर्वतराजी, आशापती हिमटापू येथेही बर्फवृष्टी झाली असल्याने तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.दोडा, भदेरवाह, किश्तवार आणि जम्मू परिसरातील पठारी प्रदेशाला मुसळधार पावसानेही झोडपून काढले आहे. जन्माष्टमीच्या सुमाराला बर्फवृष्टी अपेक्षितच असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.