भारतरत्न लता मंगेशकर यांचा सो कॉल्ड प्लेबॅक सिंगर (तथाकथित पाश्र्वगायिका) असा उल्लेख करणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’वर जोरदार टीका होताच त्यांनी नमती भूमिका घेत आपल्या वृत्ताबाबत तातडीने खुलासा केला आहे. हॉलीवूडमध्ये पाश्र्वगायन ही संकल्पनाच नाही, त्यामुळे लता मंगेशकर या पाश्र्वगायिका आहेत म्हणजे नक्की काय ते वाचकांना समजावे म्हणून सो कॉल्ड प्लेबॅक सिंगर असा उल्लेख करण्यात आल्याचे दैनिकाच्या संपादकीय मंडळाचे म्हणणे आहे, असा खुलासा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या दक्षिण आशिया ब्युरो प्रमुख एलन बेरी यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. प्लेबॅक सिंगर याचा अर्थ माहिती नसलेल्या भारताबाहेरील वाचकांसाठी असा उल्लेख करण्यात आला, त्यामध्ये कोणतीही टिप्पणी आम्ही केलेली नाही, असे बेरी यांनी म्हटले आहे. तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडीओबाबतच्या वृत्तात वरील उल्लेख करण्यात आला होता.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ