26 January 2021

News Flash

.. तर व्हाइट हाऊस सोडू -ट्रम्प

मतदानात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला असून त्याबाबत पुरावे देण्याचे मात्र टाळले आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी वृंदाने जो बायडेन यांना ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीत विजयी घोषित केले तर आपण व्हाइट हाऊस सोडण्यास तयार आहोत असा नरमाईचा सूर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आळवला आहे पण अजूनही त्यांनी पराभव मान्य केलेला नाही. मतदानात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला असून त्याबाबत पुरावे देण्याचे मात्र टाळले आहे. त्यांनी सांगितले की, प्रतिनिधी वृंदाने बायडेन यांची निवड केली तर ती मोठी चूक असेल. ते मान्य करणे कठीण आहे. प्रतिनिधी वृंदाने बायडेन यांना विजयी घोषित केल्यास काय कराल असे विचारले असता व्हाइट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ते मान्य करणे कठीणच आहे. त्यांनी बायडेन यांना विजयी घोषित केले तर ती मोठी चूक असेल.

बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणूक ३०६ विरुद्ध २३२ मतांनी जिंकली असून ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांनी सत्तांतराच्या प्रक्रियेस या आठवडय़ात मंजुरी दिली असली तरी अजून पराभव मान्य केलेला नाही. त्यांनी सांगितले की, अध्यक्षीय निवडणूक हा मोठा घोटाळा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 12:19 am

Web Title: so leave the white house trump abn 97
Next Stories
1 करोनाच्या धास्तीने किम यांच्याकडून दोघांना मृत्युदंड
2 उच्च न्यायालयाला घटनात्मक कर्तव्याचा विसर
3 विकासदर उणेच!
Just Now!
X