सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्या सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंग प्रा.लि. या कंपनीला अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशनकडून एसीआरए नियमांचे उल्लंघन करून ३ कोटी रूपयांची मदत देण्यात आली होती. त्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
दरम्यान, सरकारने मुंबईतील जुहू येथे या आस्थापनेचे असलेले खाते गोठवले आहे.खाते गोठवल्याच्या विरोधात तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांनी अहमदाबाद उच्च न्यायालयात दाद मागितले आहे.  गृह मंत्रालयाने सांगितले की, या कंपनीला परदेशी देणगी नियंत्रण कायद्यान्वये नोंदणी नसल्याने पैसे स्वीकारण्याची परवानगी नव्हती. या कंपनीला कायद्याचे उल्लंघन करून ३ कोटी रूपये मिळाले होते, त्याची सीबीआय चौकशी करण्याचे पत्र गृह मंत्रालयाने पाठवले आहे व  कंपनीचे आयडीबीआय बँकेतील खाते गोठवले आहे. सेटलवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यात यश आले नाही, त्यांनी एसएमएसला उत्तर दिलेले नाही. आपण मंत्रालयाच्या चौकशीत सहकार्य करीत आहोत असे त्यांनी पूर्वी म्हटले होते.